Kolhapur News: औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूरच्या कागलमध्ये (Kagal) गेल्या आठवड्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.दगडफेक आणि दंगलीच्या घटनाही काही भागात घडल्या. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी स्टेट्स व्हायरल करणाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितलं.
शहरात तणावपूर्ण शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत.तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Kolhapur Riots)
गेल्या आठवड्यात कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याचे व्हायरल झाले होते. औरंगजेबाचे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आणि काही तरुणांनी कागल पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली. संबंधित तरुणाविरोधात दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी जमावाला दिली. (kolhapur Politics)
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी नागरिकांना आणि व्यापार्यांना बोलावून बैठक घेत बंद न करण्याचे आवाहन केले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली. पण अचानक या आक्षेपार्ह स्टेटसचे स्क्रिनशॉट व्हायरल झाल्याने कागलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास खर्डेकर चौकात जमाव जमला आणि कारवाई करण्याची मागणी केली. खर्डेकर चौकानंतर गैबी चौकातही काही तरुणांची घोळका जमला घोषणाबाजी झाली. पोलिसांना रॅपिड अॅक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले. (Maharashtra Politics)
Edited By- Anurdha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.