Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संतांच्या दर्शनासाठी सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकवा!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Suriya Sule) या संतनगरीचा इतिहास पाहण्यासाठी आज (ता. ३० सप्टेंबर) मंगळवेढा (Mangalveda) दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकवा देत संतांच्या समाधीचे दर्शन घेतले. (Avoiding the crowd, Supriya Sule took darshan of the saint's)

संत चोखोबा, संत कान्होपात्रा, दामाजीपंत या संतांचा इतिहास जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज मंगळवेढा येथे आल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट दिली. शहा व परिवाराच्या वतीने आणि डाॅ. प्रणिता भालके यांनी खासदार सुळे यांचा सत्कार केला. पक्षासाठी केलेल्या कामाचा अहवाल त्यांनी सादर केला. या वेळी भगिरथ भालके, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामचंद्र जगताप, पी. बी. पाटील, चंद्रशेखर कौंडुभैरी, माजी नगराध्यक्ष अरुणा माळी, सोमनाथ माळी, संगीता कट्टे उपस्थित होते.

शहा यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेतले. या वेळी दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, अजित जगताप, विजय खवतोडे, प्रकाश गायकवाड, प्रवीण खवतोडे, अविनाश शिंदे, जयराज शेंबडे उपस्थित होते. त्यानंतर ५२ वर्षांची परंपरा असलेल्या जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले. या दौऱ्यातील गर्दी पाहून त्यांनी कार्यकर्त्यांना चकवा दिला. गर्दी टाळण्यासाठी गाडी चालू करून त्यापुढे गेल्या. थोडे पुढे गेल्यानंतर त्या पुन्हा परत आल्या. त्यानंतर त्यांनी या भागाचे अभ्यासक आणि कवि इंद्रजित घुले यांना सोबत घेऊन परिसराची माहिती घेतली.

कवी इंद्रजीत घुले यांना सोबत घेऊन त्यांनी संत दामाजी पंतांचे दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा त्या चोखोबा समाधीस्थळी आल्या. त्या ठिकाणी त्यांनी संत चोखोबांचा इतिहास जाणून घेतला. चोखोबा ट्रस्टच्या वतीने अविनाश शिंदे आणि जयराज शेंबडे यांनी सत्कार केला. त्यानंतर देवीची पुन्हा दर्शन घेऊन कान्होपात्रा मंदिर येथे समाधीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. माजी नगराध्यक्ष अरुणा माळी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंगळवेढ्यातील संतनगरीचा इतिहास मोठा आहे. हा इतिहास नवीन पिढीला समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांच्या पुढाकारातून मास्टर प्लॅनची आवश्यकता आहे, त्यासाठी काही तज्ज्ञांशी बोलणार आहे. तसेच, संत चोखोबा स्मारकाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. संत नगरीत भाविकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेला पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाच्या प्रश्नासंदर्भात त्या म्हणाल्या की, संसदेच्या आगामी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहे.

खासदार सुळे यांनी मंगळवेढ्यातील नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, शहरात लावलेल्या डिजिटल फलकावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील व इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वादावादी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT