Babanrao Dhakne News, Prataprao Dhakne News, Ahmednagar News
Babanrao Dhakne News, Prataprao Dhakne News, Ahmednagar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बबनराव ढाकणेंनी भावूक होऊन प्रतापरावांच्या गळ्यात घातला हार : पिता-पुत्रांना झाले अश्रू अनावर

सरकारनामा ब्युरो

Ahmednagar News

अहमदनगर - बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर आज (सोमवारी) माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनावरील 'महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे' या पुस्तकाचे प्रकाशन आणि कारखान्याच्या 30 केएलपीडी क्षमतेच्या डिस्टीलरीचे उदघाटन शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी कुटुंब व नातेवाईकांना आयुष्यात वेळ देता आला नाही. या बद्दल जाहीर माफी मागत मुलगा प्रतापराव ढाकणे यांच्या गळ्यात हार घाऊन मिठी मारली. त्यामुळे पिता-पुत्रांना अश्रू अनावर झाले होते. ( Babanrao Dhakne gets emotional and puts a necklace around Prataprao's neck: Father and son shed tears )

या कार्यक्रमात बबनराव ढाकणे यांनी सांगितले की, ''वयाच्या चौदाव्या वर्षापासून, आयुष्यातील 48 वर्षे संघर्ष केला. या काळात समाजातील फाटक्या तुटक्या लोकांसाठी काम करत असताना घर, कुटूंब, मुले, नातेवाईक यांच्याकडे दुर्लक्ष झाले, मी केलेल्या संघर्षासारखा मुलगा संघर्ष करतोय, तीन वेळा पराभव झाला पण हार माली नाही. यापुढेही तो संघर्ष करत राहिल, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी आपल्या कारकीर्दीला उजाळा देत मुलगा प्रताप ढाकणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रताप ढाकणे यांच्यासह इतराना भरून आले आणि अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितीत लोकही सदगदीत झाले.  (Babanrao Dhakne news in Marathi)

बबनराव ढाकणे म्हणाले, एक गोष्टीचे मला आजही वाईट वाटते, मी अनेकांचा मित्र राहिलो, रस्ताभर फिरत राहिलो, पण कुटूंबाकडे दुर्लक्ष केले, मुले, नातू, नातेवाईकांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो नाही. त्यामुळे नातेवाईकांचा, मुलाबाळांचा, नातवांचा ही माझ्यावर राग आहे. मी त्यांच्यावर अन्यायच केला. आता मुलगा प्रतापच्या जीवनातही संघर्ष आलाय, त्या संघर्षालाही तो कंटाळला नाही. तीन वेळा विधानसभेला पराभव झाला, मात्र त्याने हार मानली नाही. सत्ता, बित्ता काही नसते. तुमच्या जीवावर (जनतेच्या) लढला आहे, कितीही वेळा पराभव झाला तरी तो तुमच्या ताकदीवर लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी कधी मुलांबाळाना जवळ घेतले नही, पण आज मी त्याने चांगले काम केले म्हणून मी त्याचा सत्कार करतो. वडिलांचे हे वाक्य एकून अॅड. प्रतापराव ढाकणे यांना रडू कोसळले. ढाकणे परिवारातील सदस्यही सदगदीत झाले.  मी पहिल्यांदा अभिमानाने पोराचा सत्कार केलाय, आणि विश्वासाने सांगतो. पुन्हा एकदा प्रताप लोकांच्या विश्वासाला पात्र होईल असे सांगत विधानसभेला विजयी होण्याची आशा व्यक्त केली. वडिलांनी मुलाचा सत्कार केल्याचा वेगळा आणि पहिल्यांदाच नगरकरांनी अनुभव घेतला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार नीलेश लंके, संग्राम जगताप, माजीमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, पांडूरंग अभंग, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, डॉ. प्रकाश घनवट, हर्षदा काकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT