Balasaheb Patil, Ravindra Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Session : शिवेंद्रराजेंनंतर बाळासाहेब पाटील आक्रमक; म्हणाले, तासवडे टोल नाक्यावर सवलती द्या

Balasaheb Patil तासवडे टोल नाका या निकषात बसत नाही. कामानिमित्त लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो, असा मुद्दा बाळासाहेब पाटील यांनी मांडला.

Umesh Bambare-Patil

Karad NCP News : दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असावा असा निकष आहे. परंतु कऱ्हाड तालुक्यातील तासवडे टोल नाका ना जिल्हा ना तालुक्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांना या टोल नाक्यावर सवलत द्यावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत केली.

टोल नाक्यावरुन Toll Plaza अधिवेशनात शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील आमदारांनी जोरदार बॅटींग केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी तासवडे टोल नाक्याचा विषय लावून धरला. या टोल नाक्यावर तातडीने सवलती द्याव्यात अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

तासवडे येथे औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. टोल नाक्याच्या जवळपास अनेक छोटी मोठी गावे आहेत. स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोलनाका असावा असा निकष आहे. परंतु तासवडे टोलनाका या निकषात बसत नाही.

कामानिमित्त लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात, त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिकांना या ठिकाणी सवलत देणार का, असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT