Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: श्रीनिवास पाटलांची माघार, सातारचा उमेदवार कोण? पवारांनी सांगितली 'ही' चार नावं

Satara Lok Sabha News: सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असं शरद पवारांनी सांगितलं.

सरकारनामा ब्यूरो

Satara Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने (Shivsena-Congress) राज्यातील काही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अद्याप एकही जागा अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे शरद पवार गटानेदेखील उमेदवारी जाहीर करण्यासाठी मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठीच आज सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha Constituency) शरद पवार (Sharad Pawar) गटाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. या वेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार यांनी सातारा लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबतची माहिती दिली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, माझं नाव काही लोकांनी सुचवलं, पण राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. जरी तुमची इच्छा असली तरी ती पूर्ण करता येणार नाही. तसेच सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी माघार घेतली आहे. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असं पवारांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी आणि साताऱ्यातील (Satara) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आज शरद पवार साताऱ्यात आले होते. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी सातारा लोकसभेसाठीचा उमेदवार पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केला जाईल, अशी घोषणा केली. याच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार? याबाबत विचारण्यात आले असता, पवारांनी सर्वांसमोर चार जणांची नावे घेत सस्पेन्स कायम ठेवला.

शरद पवार म्हणाले, सातारच्या लोकसभेसाठी तीन ते चार नावे चर्चेत आहेत. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. आम्ही यावरती चर्चा करून सातारचा उमेदवार लवकरच घोषित करू, असंही पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी या बैठकीत ज्या चार जणांची नावे घेतली त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली असून, यापैकी नेमकं कोणाला तिकीट मिळणार, याबाबतची कार्यकर्त्यांसह नेत्यांनादेखील उत्सुकता लागून राहिली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT