Samrudhi Highway Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्गाला शिवसेना आमदाराचा खोडा

राज्यातील मुंबई ते गडचिरोली असा बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग ( समृद्धी महामार्ग ) करण्याचा घाट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी घातला आहे.

सरकारनामा ब्युरो

बुलढाणा - राज्यातील मुंबई ते गडचिरोली असा बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग ( समृद्धी महामार्ग ) करण्याचा घाट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी घातला आहे. मात्र या महामार्गामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आमदार रायमूलकर यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिल्याची चर्चा राज्यभर आहे. ( Balasaheb Thackeray lashes out at Shiv Sena MLA over expressway: Raimulkar goes on hunger strike )

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले व महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते हे चिंचोळे आहेत. त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर दुरून जावे लागत असल्याची तक्रार करत आज शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याचं समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधात मेहकर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करत आहेत.

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मेहकर, लोणार तालुक्यातील जवळपास 100 किमी रस्ते खाराब झाले आहेत. ते तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, पालखी मार्ग तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, शेतकऱ्यांना रस्ते करून द्यावेत या मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कामाच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदाराच हे आंदोलन असल्याने आता यात काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबत असंख्य शेतकरी ही बसलेले आहेत, आणि कामाला तात्काळ सुरवात करा, तोपर्यंत आंदोलनाची माघार नसल्याची भूमिका आमदार रायमुलकर यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT