Balasaheb Thorath News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Congress News : नगर जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी म्हणजे 'सब कुछ बाळासाहेब थोरात' !

Balasaheb Thorath News : संगमनेर तालुक्यातील थोरातांशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जिल्ह्या कार्यकारिणी घोषित केली असून, कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची संख्या पाहता नागवडे यांनी जम्बो कार्यकारिणी करत सर्व 14 तालुक्यांतील कार्यकर्त्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे, असे असले तरी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे पाहता सब कुछ बाळासाहेब थोरात, असेच एकूण नव्या कार्यकारिणीचे स्वरूप आहे. (Latest Marathi News)

याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पक्षासाठी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून या निवडी केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार या निवडी करण्यात आल्या असून, थोरातांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष चांगले काम करत असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

निवडलेल्या जंबो कार्यकारिणीत तब्बल 22 उपाध्यक्ष, 38 सरचिटणीस, 46 चिटणीस इतक्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कार्यकारी सदस्य म्हणून 42 जणांची निवड करण्यात आली आहे. याखेरीज कायम निमंत्रित सदस्यांमध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, विधानसभा-लोकसभा निवडणुकीचे उमेदवार, प्रदेश कमिटी सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष यांनाही स्थान दिले गेले आहे.

सचिन गुजर, प्रशांत दरेकर, डॉ. एकनाथ गोंदकर, मधुकर नवले, हिरालाल पगडाल, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, ज्ञानदेव वाफारे, विश्वास मुर्तडक, अभिजित लुनिया, अशोक कानडे आदी जिल्ह्यातील नेत्यांचा कार्यकारिणीत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील थोरातांशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 2019 विधानसभेला काँग्रेस पक्षाचे संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूर(राखीव अनुसूचित जाती) मधून लहू कानडे हे दोन आमदार निवडून आले आहेत. येणाऱ्या विधानसभेसाठी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एकूण बारापैकी किमान सहा जागा आणि लोकसभेच्या दोनपैकी एक जागेवर दावा मविआकडे करणार असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी स्पष्ट केले. लोकसभेसाठी शिर्डीच्या जागेसाठी आग्रह करणार असून, ती जागा न मिळाल्यास नगर दक्षिणेवर दावा केला जाईल, असेही नागवडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT