Manoj Pawar joins Shiv Sena
Manoj Pawar joins Shiv Sena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : सोलापुरात शिंदे गटाला शिवसेनेचा दणका; उपजिल्हाप्रमुखाचा ठाकरे गटात प्रवेश

विश्वभूषण लिमये

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला सोलापुरात (Solapur) मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (Balasaheb's Shiv Sena) सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार (Manoj Pawar) यांनी शिवसेनेत (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या सोलापुरातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पवार यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेने अक्कलकोटच्या पक्षांतरांचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे. (Balasaheb's Shiv Sena's Solapur Upazila chief Manoj Pawar joins Shiv Sena)

एकनाथ शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह २१ जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बरडे यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

शिवसेनेत प्रवेश केलेले हे सर्व पदाधिकारी अक्कलकोट तालुक्यातील आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमधील अख्खी शिवसेना शिंदे गटात सामील झली होती. त्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने शिंदे गटाला दणका दिला आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने शिंदे गटाला धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झालेल्या मनोज पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहेत. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. या सर्वांचे दोन नंबरचे धंदे आहेत. ते सांभाळण्यासाठी तसेच सत्तेमुळे ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गट हा दोन वर्ष देखील टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे, अशा शब्दांत पवार यांनी सोलापुरातील शिंदे गटावर घाणाघात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT