Udayanraje Bhosale, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP News : सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत बावनकुळेंचे महत्त्वपूर्ण विधान; भाजप की, घटक पक्ष...?

Chandrashekhar Bawankule News : सातारा, वाई, कोरेगाव तालुक्यांतील तीनशे कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभेचा उमेदवार हा पार्लमेंटरी बोर्डाकडून ठरवला जाईल. तो भाजपचा की, घटक पक्षांचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्तमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून घेतील, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सातारा Satara येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारा, वाई, कोरेगाव तालुक्यांतील तीनशे कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भाजप हा जास्त आमदार संख्या असलेला पक्ष असून, या नात्याने मोठा घटक पक्ष आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जी कामे केली, त्याची स्वतंत्र पुस्तिका छापून आम्ही वॉरियर्सच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा लोकसभेचा उमेदवार हा पार्लमेंटरी बोर्डाकडून ठरवला जाईल. तो भाजपचा की, घटक पक्षांचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्तमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून निर्णय घेतील.

निवडणुकीपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री...

१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, तुम्हा पत्रकारांचा असा प्रश्न असेल तर मी स्वतः तुम्हाला मुंबईला राहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घेऊन जातो. तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा. मात्र, आगामी २०२४ च्या निवडणुकांपर्यंत महायुती सरकारचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT