Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : आगलाव्यांपासून सावध राहा; जयकुमार गोरेंचा निशाणा कोणावर?

State Road Transport Corporation Anniversary : माझं तुम्हा सर्वांना हेच सांगणं आहे, तुमचे हक्क, अधिकार तुम्हाला मिळालेच पाहिजेत. पण, ही व्यवस्था बंद पडेल, असं काही आपल्या हातून होऊ नये.

रुपेश कदम

Dahiwadi, 02 June : आपल्या हक्कासाठी लढत असताना आगलाव्यांपासून सावध राहिलं पाहिजे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कामगार म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत राहिलो आहे. चालक, वाहकांची बाजू आम्ही कायम मांडलीय व मांडत राहू, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त दहिवडी आगारात आयोजित कार्यक्रमात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) बोलत होते. या वेळी सोनिया गोरे, नगराध्यक्षा नीलम जाधव, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, तसेच आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हणमंत फडतरे,   वाहतूक निरीक्षक बाबूराव खाडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक जगदीश लोंढे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, गिरणी कामगाराचं आंदोलन झालं. ते आंदोलन शेवटपर्यंत संपलंच नाही. आंदोलन संपता संपता गिरणी संपल्या आणि कामगार देशोधडीला लागला. माझं तुम्हा सर्वांना हेच सांगणं आहे, तुमचे हक्क, अधिकार तुम्हाला मिळालेच पाहिजेत. पण, ही व्यवस्था बंद पडेल, असं काही आपल्या हातून होऊ नये. एसटीच्या (ST) सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे.

दहिवडी आगाराशी माझं जिव्हाळ्याचे नाते आहे. हे आगार माझ्या काॅलेज जीवनाचं अविभाज्य भाग आहे. खूप मनापासून इथले सर्व कर्मचारी काम करताना दिसत आहेत. त्यामुळेच ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक' स्पर्धेत या आगाराने यश मिळवले. असंच चांगले काम कायम राहावं, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केले.

दहिवडी येथे अद्यावत व सुसज्ज आगार कसं उभं राहील, यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. मात्र, आगलाव्या लोकांपासून सावध राहावे, असा सल्ला जयकुमार गोरे यांनी एसटीचे महांडळाचे अधिकारी आणि कामगारांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT