Rebel Shivsena MLA
Rebel Shivsena MLA Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गुवाहाटीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये मारहाण...? प्रकाश आबिटकर म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. संतप्त शिवसैनिकांकडून तोडफोड झाल्याच्या घटना समोर येत आहेत, दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या कार्यकर्त्यांकडूनही शिवसेनेला (shivsena) प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये दोन बंडखोर आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी एका वृतवाहिनीने दाखवली होती. मात्र, त्याबाबत कोल्हापूरच्या राधानगरीचे बंडखोर आमदार प्रकाश आबीटकर (Prakash Abitkar) यांनी पुढे येऊन खुलासा केला आहे. (Beaten between two rebel MLAs In Guwahati? Prakash Abitkar said ...)

आमदार आबीटकर यांनी हे वृत्त खोडसाळपणाने दिल्याचे म्हटले आहे. असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील एका वृत्तवाहिनीवर गुवाहाटीमध्ये दोन आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी आली आहे. त्या बातमीमध्ये माझ्याही नावाचा उल्लेख आहे. मात्र, अशा पद्धतीची कोणतीही घटना घडलेली नाही. या सर्व गोष्टी अफवा आहेत. अशा प्रकारच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रकाश आबीटकर यांनी केले आहे.

बंडखोर १५ आमदारांना 'Y+' दर्जाची सुरक्षा

दरम्यान, शिवसैनिकांच्या वाढत्या संतापामुळे केंद्र सरकारने बंडखोर पंधरा आमदारांना 'Y+' दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये या आमदारांमध्ये प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, दादा भुसे, प्रदीप जयस्वाल संदीपान भूमरे, योगेश कदम, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, संजय राठोड, संजय शिरसाट, मंगेश कुडाळकर, लता सोनवणे, दिलीप लांडे आणि बालाजी किणीकर या आमदारांचा समावेश आहे.

गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतर रविवारी केंद्र सरकारने पंधरा आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. या आमदारांना केंद्राकडून देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षाव्यवस्था अपवादात्मक स्थितीतच पुरविली जाते. त्यामुळे बंडखोर आमदारांना केंद्राने दिलेल्या सुरक्षेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पंधरा आमदारांना आता सीआरपीएफच्या जवानांचं सुरक्षाकडं असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT