Crime Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Dhas News : महिलेला मारहाण प्रकरण; सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया

Beed News : प्राजक्ता धस यांच्यासह दोघा जणांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Mangesh Mahale

Beed : पारधी समाजातील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या पत्नी प्राजक्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"ही घटना खोटी असून यात तोडून-मोडून काही प्रकार दाखविण्यात आला आहे. मी पोलिसांनी विनंती केली आहे की याची फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन चौकशी झाली पाहिजे. मी पंचवीस वर्षापासून काम करीत आहे. आदिवासी, दलित समाजाच्या बाबतीत मी कसा वागतो, हे सगळ्यांना माहित आहे. या प्रकरणामागे कोण आहे, हे तपासले पाहिजे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून हा काय प्रकार आहे, ते लोकांसमोर आणावे ही माझी मागणी आहे," असे सुरेश धस यांनी सांगितले.

काही दिवसापूर्वी जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आष्टी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोघा जणांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जमीन ताब्याच्या कारणातून पारधी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी महिला व तिच्या पतीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे संबधित महिलेने आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून प्राजक्ता सुरेश धस यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT