Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आयुर्वेद हा सर्वात जुना वेद...

Amit Awari

अहमदनगर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज आले आहेत. या दौऱ्याची सुरवात त्यांनी विखेंच्या प्रवरा लोणीपासून केली. प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमिपूजन व डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. त्या प्रसंगी त्यांनी आयुर्वेदाचे महत्त्व कथन केले. Bhagat Singh Koshyari said, Ayurveda is the oldest Veda ...

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ज्या प्रकारे योगासनांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसाच आयुर्वेद अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. उपचार पद्धतीत अॅलोपॅथी एवढेच आयुर्वेद व योगासने महत्त्वाची आहेत. आयुर्वेद हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. आयुर्वेद हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षाही कोश्यारी यांनी व्यक्त केली.

कोश्यारी पुढे म्हणाले, आयुर्वेद हा सर्वात जुना वेद आहे. आज आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. तरी सुद्धा आज आपण आपल्या परंपरेत असलेल्या आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहितेमध्ये 'गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा' ही जीवनशैली नमूद केली आहे. आयुर्वेदाचे महत्त्व ओळखत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र 'आयुष्य मंत्रालय' स्थापन केले असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले.

स्वस्त किंमतीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात 'जन औषधी केंद्र' स्थापन झालेले आहेत. योगाचा प्रचार-प्रसारांवर त्यांचा भर राहिलेला आहे. 'प्रवरा मेडिकल ट्रस्ट' ने सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे‌. असे गौरवोद्गार ही कोश्यारी यांनी यावेळी काढले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र विखे-पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ.व्ही.एन.मगरे यांनी प्रास्ताविक केले. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या प्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त मोनिका सावंत इनामदार यांची प्रमुख उपस्थित होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT