BJP  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP News : भारत संकल्प यात्रेवरून तुफान राडा; भाजप-डाव्या आघाडीचे कार्यकर्ते भिडले

BJP Sankalp Yatra Workers Clash In Kolhapur : भाजपच्या भारत संकल्प यात्रेवरून कोल्हापुरात मोठा राडा झाला....

Rahul Gadkar

Kolhapur Politics News : गेल्या काही दिवसांपासून भाजपने गावोगावी जाऊन भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. गाड्या वस्त्यावर जाऊन भाजपच्या विविध योजना, सरकारच्या विविध सवलती आणि विकास कामे याबाबत माहिती देण्याचे काम सुरू आहे.

पण या संकल्प यात्रेत मोदी सरकार या नावाला विरोध करून डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या संकल्प यात्रेला विरोध केला आहे. दरम्यान, विरोधक आणि भाजपचे समर्थक आमने-सामने आल्याने कोल्हापुरात वादावादी झाली. काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कोल्हापुरातील सोन्या मारूती चौकात गुरूवारी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला जोरदार विरोध झाला. जनतेच्या पैशातून मोदी आणि भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करीत असताना केंद्र सरकार न म्हणता मोदी सरकार असे फलकावर का लिहिले? असा जाब विचारत भाजपच्या समर्थकांना धारेवर धरले. यावेळी भाजप समर्थक आणि विरोधकांमध्ये काहीवेळ वादावादी झाली.

केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा शहरातून काढत आहे. यावर सरकारी निधी नाहक खर्च जात असल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे एका युवकाने बुधवारी भाजपची भारत संकल्प यात्रा उधळून लावली होती. जनतेचा पैसा असेल तर मोदी सरकार असे का म्हणता? अशी विचारणा केल्यानंतर ते निरूत्तर झाले होते.

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोन्या मारुती चौकात आजही असाच प्रकार घडला. केंद्र सरकारच्या योजना असताना मोदींच्या योजना असे का म्हणत आहात? असे का फलक लावला आहे? मोदी स्वत: खिशातून प्रचारासाठी पैसे खर्च करत आहेत का? असे प्रश्न विरोधकांनी समन्वयकांना विचारला. 

दरम्यान, या प्रकारची माहिती भाजप समर्थकांनी अन्य भाजप पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजपचे अन्य कार्यकर्ते सोन्या मारुती चौकात दाखल झाल्यानंतर जोरदार वादावादी झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत भाजप समर्थकांना आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT