Maharashtra Health Minister Prakash Abitkar during election preparations as Bhudargad taluka heads into a high-stakes Kolhapur Zilla Parishad election battle. sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : होमग्राऊंडवरच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची ताकद पणाला; विरोधकांसह महायुतीतील मित्र पक्षासोबत सामना

Kolhapur Zilla Parishad Election : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भुदरगड तालुक्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, महायुती आणि विरोधी शिवशाहू आघाडीमध्ये तुल्यबळ सामना रंगणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur ZP : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले अपयश आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजयामुळे संभ्रमावस्थेत सापडलेल्या राधानगरी-भुदरगड तालुक्याची राजकीय किनार आता जिल्हा परिषद निवडणुकांमुळे समोर येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे होमपीच असणाऱ्या भुदरगड तालुक्यात मोठी कसोटी आहे.

तालुक्यात महायुतीचे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल देसाई व सत्यजित जाधव यांचा काँग्रेस पक्ष यांच्यातून शिवशाहू आघाडी आकाराला आली आहे. त्यांच्याविरोधात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजप युतीचे आव्हान राहिले आहे. आबिटकर यांच्या घरातूनच उमेदवार असल्याने निवडणूक प्रतिष्ठिची बनली आहे.

भुदरगड तालुक्यात गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डे, कडगाव हे चार जिल्हा परिषद गट, तर पंचायत समितीचे कूर, आकुर्डे, गारगोटी, मडिलगे बुद्रुक, पिंपळगाव, पुष्पनगर, कडगाव, मठगाव, असे आठ गण आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत भुदरगड तालुक्यात नेत्यांनी सक्षम उमेदवार निवडण्यासाठी जंग पछाडले. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ही लढत पारंपरिक व तुल्यबळ होत आहे. अरविंद सुतार भुदरगड तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटांच्या राजकारणाची वाटचाल आजपर्यंत सुरू आहे.

विशेष म्हणजे, यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वच जागा महिलांसाठी राखीव असल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत व अनेक इच्छुक नेत्यांची कोंडी झाली आहे. भुदरगड तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट सध्या स्थानिक मातब्बर नेतृत्वाकडे आहेत. त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभे करण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर होते. पण, दोन्हीही गटांकडून तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. त्यातच आघाडी व युती कशी होणार?, कोण कोणासोबत जाणार? यावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी जनता कोणाला स्वीकारणार व कोणाला नाकारणार? याकडे लक्ष लागले आहे.

विरोधात माजी आमदार के. पी. पाटील हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेस सोबत आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या काँग्रेसला 2 जागा व पंचायत समितीला 3 जागा दिल्या आहेत. शिवसेना-भाजप युतीत जिल्हा परिषदेच्या 4 व पंचायत समितीच्या 5 जागा शिवसेनेला, तर पंचायत समितीच्या तीन जागा भाजपला दिल्या आहेत. उमेदवारी जाहीर होताच इच्छुकांनी सोशल मीडियावरून प्रचाराचा धडाका सुरू केला असून, संपर्क दौरे, कार्यकर्त्याच्या भेटीगाठींना या पूर्वीच सुरुवात केली आहे.

वर्षांपूर्वी कै. लेमनराव निकम यांनी प्रकाश आबिटकर यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून अपयशातही पाठ फिरवली नाही, उलट उभारी देणारा भविष्यातील नेता म्हणून आधार दिला. त्या विश्वासातूनच आबिटकरांची आमदारकी, मंत्रिपद व पालकमंत्रिपदाचा प्रवास घडला. आज त्या ऋणाची जाणीव ठेवत कै. निकम यांच्या वारसदारांची जबाबदारी स्वीकारत 'आकुर्डे' गटातून सून अर्चना कल्याणराव निकम यांना विजयी करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT