Nitin Gadkari-Uddhav Thackeray-Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात ठाकरे, गडकरी, पवार, फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर!

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरात भूमिपूजन

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी आज (ता. २४ ऑक्टोबर) येथे पत्रकार परिषदेत दिली. (Bhumi Pujan of Sant Dnyaneshwar and Sant Tukaram Maharaj Palkhi Marg on 30th October at Pandharpur)

दरवर्षी लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, या साठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम घेता आला नाही. त्यानंतर आता येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी आज येथे दिली.

या वेळी भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, सुभाष मस्के आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT