Uday Samant
Uday Samant sakal
पश्चिम महाराष्ट्र

भूमिपुत्रांना स्थानिक कंपन्यात नोकऱ्या देणार : उदय सामंत

अश्पाक पटेल

शिरवळ : कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया थांबुन न देता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन शिक्षणाची प्रभावी अमंलबजावणी झाली. नायगावकरांच्या मागणीप्रमाणे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नायगांवला आणणार असुन भूमिपुत्रांना स्थानिक कंपन्यात नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी पुढील दोन महिन्यात मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगांव येथील शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, शिवसेना जिल्हा महिला संघटक शारदा जाधव, हाय-टेक कंपनीचे मॅनेजर दर्शन मोडकर, प्रदिप माने, वाई विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, प्राचार्य कोकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात आभियांत्रिकी महाविद्यालयाचे जाळे सध्या राज्यभर आहे. मात्र, येथील 75 टक्के जनता कृषीवर अवलंबून असताना केवळ चार कृषी विद्यापीठांद्वारे कृषी शिक्षण दिले जात असल्याची खंत व्यक्त करुन राज्यात कृषी महाविद्यालयाचीही याचप्रमाणे निर्मिती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी हाय-टेक या कंपनी तर्फे प्राथमिक शाळेत 48 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.

तर तालुकाप्रमुख जमदाडे यांनी स्थानिकांना कंपन्यात नोकऱ्या मिळावे तसेच परिसरातील गावात 21 कोटींच्या विकासकामांची मागणी केली.दरम्यान मंत्री उदय सामंत, उपनेते नितीन बानगुडे- पाटील व इतर मान्यवरांनी सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्तविकात सरपंच पूनम नेवसे यांनी केले. सुधीर नेवसे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT