nagawade karkhana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नागवडे कारखान्यात झाला मोठा अपघात : साडेचार कोटींचे नुकसान

आता नागवडे साखर कारखाना पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्या पॅनलने सत्ता राखली. ही निवडणूक जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आता हा कारखाना पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण काल (गुरवारी) या कारखान्यात मोठा अपघात झाला. यात सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. ( Big accident at Nagwade factory: Loss of Rs 4.5 crore )

नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकी तापमान वाढून फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (ता. 10) पहाटे घडली. टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की त्याने शेजारची संरक्षक भिंत पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली.

सध्या नागवडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखाना साखरेबरोबर उपपदार्थ तयार करतो. कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील टाक्यांमध्ये मळी साठविण्यात येते.गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान वाढल्याने टाकी फुटली. या टाकीची साठवणक्षमता साडेचार हजार टन असून, तीत 4 हजार 100 टन मळी साठविली होती. टाकी फुटल्याने ही मळी वाहून गेली. मात्र, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. संरक्षक भिंत कोसळली. कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखाना प्रशासनाने उत्पादनशुल्क विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

मोठा अनर्थ टळला

कारखान्याचे सचिव बापूराव नागवडे म्हणाले, की घटना पहाटे घडल्याने मोठा अनर्थ टळला. त्या परिसरात कामगार अथवा आजूबाजूला लोक नव्हते. या घटनेबाबत कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी तातडीने सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT