Vishwajit Kadam
Vishwajit Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : विश्वजित कदमांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

सरकारनामा ब्यूरो

शिराळा (जि. सांगली) : सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी शुक्रवारी (ता. १५ एप्रिल) सांगली जिल्ह्यातील भाजपचा (bjp) मोठा नेता कॉंग्रेसमध्ये (congress) येणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर आज (ता. १६ एप्रिल) जिल्ह्याच्या दोन टोकावरील नेत्यांबाबत काहूर उठले. काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या सत्यजीत देशमुख यांच्याबाबत आज दिवसभर चर्चा सुरू होती. देशमुख यांनी मी आहे तिथेच स्थिर आहे. (Big BJP leader to join Congress: Vishwajit Kadam)

माजी राज्यमंत्री व भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी १५ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. युती सरकारमध्ये हुकलेली मंत्रीपदाची संधी २०१४ मध्ये त्यांना अपेक्षित होती. तसेच, त्यांच्या अडचणीतील संस्थांना मदतीचीही अपेक्षा होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपमधून झाला नाही, असा त्यांचा आक्षेप होता.

शिवाजीराव नाईक यांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपमध्ये देशमुख आणि महाडीक असे दोघे नेते उरले आहेत. सम्राट महाडिक यांनी विधानसभेची तयारी सुरु आहे. पेठ नका येथे आठ दिवसांपूर्वीच नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण कार्यक्रमात ‘सम्राट आमदार व्हावा, हे नानासाहेब महाडिक यांचे स्वप्न देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील’ असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचवेळी त्यांनी महाडिकांना वाळवा, शिराळा या तालुक्यांपुरते मर्यादित न राहता जिल्ह्याचे राजकारण करावे, असा सल्लाही दिला होता.

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर सत्यजित देशमुख यांनी २०१४ मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. सत्यजित आमदार व्हावा, ही देशमुख साहेबांचे स्वप्न होते. ते आम्ही पूर्ण करू, असे भाजपने आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्यजित यांनी भाजपचा रस्ता धरला होता. शिवाजीराव नाईक यांना २०१४ मध्ये विधानसभेचे तिकीट दिले. त्यावेळी ‘आम्हाला एक आमदार द्या; आम्ही तुम्हाला दुसरा आमदार देऊ,’ असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावेळी सत्यजित देशमुख यांचा कार्यकर्ता सुखावला होता. मात्र, पराभवानंतर देशमुख यांच्याकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केल्याची त्यांच्या कार्यकर्त्याची भावना आहे.

विश्‍वजीत यांच्या वक्तव्यामुळे आज देशमुख यांच्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, देशमुख म्हणाले की, मला विश्‍वजीत यांच्या नेमक्या वक्तव्याबाबत काहीच माहित नाही. मात्र मी आहे, तिथेच स्थिर आहे, हे मी सांगू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT