amal mahadik
amal mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सतेज पाटलांना टक्कर देणाऱ्या अमल महाडिकांकडे २१ कोटींची मालमत्ता

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज पाटील (satej patil) यांना टक्कर देण्यासाठी विधान परिषदेच्या मैदानात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आज (ता. २२ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये त्यांनी त्यांची कौटुंबीक आणि मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे २१ कोटी ४४ लाख ४० हजार इतकी संपत्ती आहे, तर ४ कोटी, ९३ लाख २६ हजाराचे त्यांच्यावर कर्ज आहे. (BJP candidate Amal Mahadik has assets worth Rs 21 crore)

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अमल महाडिक यांचे नाव भाजपकडून दोन दिवसांपूर्वी नक्की झाले होते. त्यांच्या नावाची घोषणा दिल्लीमधून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आज (ता. २२ नोव्हेंबर) पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. जयंत पाटील, समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.

अर्जासोबत सांपत्तीक स्थिती, कौटुंबीक माहिती तसेच अन्य व्यक्तीगत माहिती देणे बंधनकारक असते. त्यानुसार अमल महाडिक यांनी अर्जासोबत आपली माहिती दिली. त्या माहितीनुसार अमल महाडिक यांच्याकडे एकूण मालमत्ता २१ कोटी, ४४ लाख, ४० हजार इतकी आहे. यामध्ये ११ कोटी ६९ लाख ६६ हजार रुपयांची अस्थायी मालमत्ता आहे, तर १ कोटी ४८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावे आहे. अधिग्रहीत मालमत्ता ७ कोटी ४३ लाख ७६ हजार इतकी असून ८२ लाख ३६ हजाराची वडिलोपार्जित मालमत्ता अमल महाडिक यांना मिळालेली आहे. त्यांच्या नावावर ४ कोटी ९३ लाख २६ हजाराचे कर्ज आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक या त्यांच्या पत्नी असून शांभवी आणि वीरकृष्ण ही अपत्ये आहेत. अमल महाडिक यांनी विवेकानंद महाविद्यालयातून २००० मध्ये बी.एस.सी ही पदवी संपादित केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT