Minister Chandrakant Patil addresses media, cautioning NCP leadership against creating separate political equations ahead of Maharashtra municipal corporation elections. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : चंद्रकांतदादांकडून महापालिकेसाठी पहिल्या युतीची घोषणा : राष्ट्रवादी-भाजप एकत्र लढणार!

Chandrakant Patil warns : चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला इशारा देत महापालिका निवडणुकांसाठी वेगळी गणिते न मांडण्याचा सल्ला दिला. महायुतीत एकसंध रणनीतीच ठेवावी, असे त्यांनी सांगलीत स्पष्ट केले.

Rahul Gadkar

NCP Alliance Warning : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकींमध्ये महायुतीच्या काही नेत्यांना मान्य नसलेल्या आघाड्या करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने जत आणि शिराळामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी बरोबर युती केली. नगरपालिकांचा व्याप मोठा होता त्यामुळे समजू शकतो. पण आता राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू असून त्यांनी वेगळी गणिते मांडू नये, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला सांगितले आहे. सांगलीत भाजपमध्ये समजुतीचे घोटाळे झाले आहेत. पण प्रत्येक घरात असे होत असते. तो फार गंभीर विषय नाही. निवडणूक आम्ही एकत्रित आणि पूर्ण ताकदीने लढू," असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जिल्हा परिषदेआधी महापालिकेच्या निवडणुका होतील, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यासाठी भाजपमध्ये तयारी सुरू झाली आहे. काही नेत्यांनी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्यामुळे अन्य नेते नाराज झाल्याची आणि त्याबाबत थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. त्यावर सध्या खल सुरू आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री पाटील यांनी, "फार गंभीर नाही, भाजपमध्ये फक्त समजुतीचे घोटाळे झाले आहेत", अशी कबुली दिली.

भाजपमध्ये (BJP) काही नेत्यांनी स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे. त्यामागे काही वेगळे गणित दिसते का, याबाबत प्रश्नावर पाटील म्हणाले, "लोकशाहीत अशा आघाड्या करण्याचे आणि नोंदणी करण्याचे अधिकार आहेत, मात्र ते आमच्या पक्षाच्या शिस्तीच्या बाहेरचे असेल तर निश्चितपणे त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल." राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाने शिराळा नगरपालिका, जत नगरपालिकेला एकत्र येऊन 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढली होती.

चंद्रकांत पाटील यांचा अशा प्रकारच्या आघाडीला विरोध होता आणि त्याबाबत ते अजित पवार यांच्याशी बोलले होते. या राजकीय तडजोडीची महापालिकेला पुनरावृत्ती होऊ शकते, याबाबत भाजपची भूमिका काय, या प्रश्नावर ते म्हणाले, "महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादीशी (NCP) चर्चा सुरू आहेत. त्यांनी वेगळी गणिते मांडू नयेत, असे सांगितले आहे. राज्यात 284 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. व्याप मोठा होता. काही ठिकाणी वेगळे घडले, मात्र आता फक्त 30 मनपाच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी तसा प्रश्न येणार नाही, असे वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT