Police intervene as BJP and Congress workers clash outside Congress Bhavan in Pune following controversial remarks and escalating political protests. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal: पुण्यातील भाजप काँग्रेसमधील राड्यानंतर हर्षवर्धन सकपाळांच्या पोस्टटने वातावरण आणखी तापलं

Pune BJP vs Congress : पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टमुळे वाद अधिक चिघळला असून दोन्ही पक्षांकडून परस्परांवर गंभीर आरोप करण्यात आले.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत, याच मुद्द्याच्या पार्श्वभुमीवर पुणे येथे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते रविवारी (ता.15) दुपारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने हिंसक वळण घेत दोन्हीकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये कार्यकर्ते जखमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं.

या राड्यानंतर दगडफेकीची सुरुवात ही काँग्रेसने केली असल्याचं भाजपकडून सांगितलं आहे. तर दुसरीकडून भाजपने काँग्रेस भवन येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत दगडफेक केली असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला आहे. तसेच काँग्रेसकडून फरासखाना पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करत शहराध्यक्ष आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.

तर भाजपनेही काही व्हिडिओ पोस्ट करून काँग्रेसने अशा प्रकारे आंदोलन चिघळवण्यासाठी पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांकडून ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही बाजूच्या आंदोलकांना शांत करण्याचं काम पोलिसांनी केला आहे.

अशातच या सर्व घडामोडींवरती हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स वरती एक पोस्ट केली आहे त्यात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. आहे असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. असा देखील आरोप या पोस्टच्या माध्यमातून सपकाळ यांनी केला आहे.

भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजप गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT