Kolhapur News : विधानसभा निवडणुकीला महायुती खास करून भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जय्यत तयारी सुरू आहे. भाजपकडून (BJP) राज्यात भाजप सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्र बूथ पातळीवर 200 सदस्य नोंदणीचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले आहे. तर इतर पक्षातील नेत्यांनाही भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. त्या अनुषंगाने प्राथमिक चर्चेसाठी जिल्ह्यात नेत्यांची दौरे सुरू आहेत. तर सदस्य नोंदणीच्या आडून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक (Local Body Election) स्वबळावर लढण्याचा डाव आखला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत 23 संख्या असलेल्या भाजपला राज्यात नऊ खासदार मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास गमावलेल्या भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत उभारी मिळाली.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल 132 चा आकडा सहज गाठला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची फौज बनवण्यासाठी भाजपचे यंत्रणा सक्रिय झाली आहे. केवळ सक्रियच झाली नाही तर स्वबळाची तयारी भाजपकडून सुरू आहे.
राज्यात भाजपने 149 विधानसभा मतदारसंघातून स्वतःचा उमेदवार उभा केला. यातून 132 आमदार निवडून आले. तर जवळपास पाच ते सहा अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आता राज्यात सर्वश्रेष्ठ पक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना जो निवडणुकीचा उत्साह आहे.
तोच उत्साहक कायम ठेवण्यासाठी भाजपने सदस्य नोंदणीला महत्त्व दिले. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसह रस्त्यावरील कार्यकर्ता हा सदस्य नोंदणीत गुंतून आहे. निवडणुकीच्या मोसमात कार्यकर्ता राहण्यासाठी त्याला टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात एक कोटी 16 लाख सदस्य नोंदणी झाली असल्याचा भाजपकडून दावा करण्यात येत आहे.
इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात देखील आगामी निवडणुकीत भाजप 'एकला चलो रे'चे संकेत देण्याच्या तयारीत आहे, हे दिसून आले आहे. जो कार्यकर्ता सदस्य नोंदणीसाठी आहे जास्त धडपडत आहे. त्यालाच स्थानिक स्वराज्य संस्थेसह आमदार खासदारकीचे तिकीट मिळणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे भाजपचे एकंदरीतच चित्र पाहता. खेळ सदस्य नोंदणीचा असला तरी डाव स्वबळाचा आहे हे स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.