Pankaja Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pankaja Munde News: पंकजा मुंडेचं 'अंबाबाई'च्या दर्शनानंतर मोठं विधान; म्हणाल्या,'' माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा; पण...''

Deepak Kulkarni

Kolhapur : माजी मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. मुंडेंच्या यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा, सांगली असा टप्पा पूर्ण करत मुंडे या कोल्हापुरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतलं. या दर्शनावेळी पंकजा मुंडे यांनी अंबाबाईकडं मागणं मागितलं आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमेदरम्यान कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण ही इच्छा आजपासूनची नव्हे तर 2014 पासूनची आहे. मी मुख्यमंत्री(Chief Minister) व्हावे असे कार्यकर्त्यांना वाटते असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडेंचं अंबाबाईला साकडं...

मुंडे यांनी अंबाबाईचं गुरुवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीकडे कोणाला उपाशी झोपू देऊ नको, आणि कोणाला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको, आपल्या दारात आलेल्या माणसाला रिकाम्या हाती जाऊ देऊ नको, अशी मागणी केल्याचे सांगितलं. याचवेळी त्यांनी शिवशक्ती परिक्रमेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 2014 पासून मी मुख्यमंत्री व्हावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. असे मुंडे म्हणाल्या.

शिंदें गटाच्या खासदाराकडून मुंडेंच्या गाडीचं सारथ्य...

पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा कोल्हापुरात दाखल झाले. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने(Dhairyasheel Mane) तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हॉटेलपासून ते अंबाबाई मंदिरपर्यंत खासदार धैर्यशील माने यांनी पंकजा मुंडे यांच्या गाडीचे सारथ्य केले.

कारखानदारांनी योग्य भूमिका घ्यावी...

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून बोलताना, ऊसतोड कामगार करार संपला आहे. यामुळे ते संपाच्या भूमिकेत आहेत. सरकारची परिस्थिती पाहता कारखानदारांनी योग्य भूमिका घ्यावी, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

मुंडेंचा मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांना टोला...

जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर उपोषणकर्ते मनोज जरांगे ठाम आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.

मुंडे म्हणाल्या, कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. "मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे," असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT