Uddhav  Thackeray, Jaykumar Gore Latest News
Uddhav Thackeray, Jaykumar Gore Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'मातोश्री'चा उंबरठा न ओलांडणारे आता शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं नाटकं करताहेत...

सरकारनामा ब्यूरो

सातारा : मुख्यमंत्री असताना ज्यांनी "मातोश्री" चा उंबरठा ओलांडला नाही. ते आता सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची नाटकं करीत आहेत. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा उद्धव ठाकरेंनी हिशोब द्यावा, अशी मागणी सातारचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका केली आहे. (Uddhav Thackeray, Jaykumar Gore Latest News)

गोरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हंटल की, मुख्यमंत्री असताना ज्यांनी "मातोश्री" चा उंबरठा ओलांडला नाही. ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटकं करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा हिशोब द्यावा आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जावे. महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहेत, ते उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाला बळी पडणार नाहीत.

गोरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना घरकोंबडा मुख्यमंत्री अशी पदवी जनतेने दिली होती. ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी, गारपीट या सारख्य संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी ठाकरेंनी एकदाही घराचा उंबरठा ओलांडून शेतकऱ्यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नव्हते. शेतकऱ्यांना एक पैशाचीही मदत न करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विदेशी दारूवरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणला होता हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही.

सत्तेवर येण्यापूर्वी याच ठाकरेंनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत देण्याची मागणी केली होती. सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या सरकारने संकटातील शेतकऱ्यांना एक दमडीही दिली नाही. हेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करीत आहेत. तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा हिशोब द्या आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जा, असा शब्दात गोरेंनी ठाकरेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT