Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sudhir Gadgil road accident : भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांचा अपघात; गाडीचा चक्काचूर, एअरबॅगमुळे बचावले

Sudhir Gadgil car accident latest news : भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. वाहनाचा चक्काचूर झाला असला तरी एअरबॅग वेळेत उघडल्याने त्यांचा जीव वाचला. जाणून घ्या संपूर्ण घटना.

Rahul Gadkar

सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या चारचाकी वाहनाला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने आमदार गाडगीळ व त्यांचे सहकारी मोठ्या अनर्थातून बचावले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक (PA), अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.

तेथून परतत असताना, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' रस्त्यादरम्यान हा अपघात झाला.​कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले.

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT