Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटील यांच्यावर भाजपच्या कारवाईची टांगती तलवार? भाजपच्या माजी आमदारांची फिल्डिंग

BJP Maharashtra Action On Ranjitsinh Mohite Patil : सोलापुरातील भारतीय जनता पक्ष विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मुडमध्ये दिसत आहे. लवकरच मोहिते पाटील यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता येथे निर्माण झाली आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Politicas : भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटीn यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून यावरूनच कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी याआधीच पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ज्यावर मोहिते पाटलांनी उत्तर दिले आहे. मात्र हे उत्तर पक्षाच्या पचणी न पडणारे असल्याने त्यांच्यावर येत्या काहीच दिवसात कारवाई होण्याची शक्यता आहे.

लवकरच कारवाईची शक्यता

भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर यावेळी त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेत विरोधकांना मदत केल्याचा दावा अनेकदा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला होता. तर यावरून पक्षाने सबळ पुरावे देखील जमवले आहेत.

दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपने मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस जारी करत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. या नोटीसला मोहिते पाटलांनी उत्तर देताना, आपण पक्षविरोधी भूमिका कुठेही मांडलेली नाही असं म्हटले आहे. मात्र पक्षाकडून सबळ पुराव्यांचा आधार घेत कारवाई होण्याची शक्यता आहे.

पण आता कारवाई झालीच तर रणजितसिंह मोहिते पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. तर ती आपली बाजू कशी मांडतात हे देखील पाहावे लागणार आहे.

सातपुतेंचा विरोध

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी अनेक थेट आक्रमक भूमिका घेतली होती. सातपुते यांनी मोहिते पाटलांनी भाजपच्या विरोधाक काम केल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती. तसेच त्यांनी, माळशिरसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी आपल्या पराभवासाठी काम केलं यामुळेच पराभव झाल्याचा आरोप सातपुतेंनी तक्रारीत केला होता. यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेत कमी मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. तसेच त्यांनी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात बहुमत मिळवले. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी भाजप करत आहे. भाजप आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागेल असून जिल्ह्यातील भाजपच्या पक्षातील बड्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झाले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने भाजपला तयारीला आणखी वाव मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT