BJP's agitation
BJP's agitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपने केले काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन

सचिन सातपुते

शेवगाव ( जि. अहमदनगर ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पंजाब दौरा झाला. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाब सरकारने त्रुटी ठेवल्या असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे ( Congress ) सरकार असल्याने भाजपकडून ( BJP ) काँग्रेसवर टीका होत आहे. BJP staged a protest movement against Congress

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवलेल्या पंजाब मधील काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) शहरातून रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. क्रांती चौकातील मनोकामना सिध्दीविनायक गणपती मंदिरात पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महाआरती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष मुंढे म्हणाले की, संपूर्ण जगात पंतप्रधान मोदी यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले. राष्ट्रीय स्तरावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेले मोदी हे संपूर्ण देशवासियांच्या आदराचे स्थान आहे. मात्र, पंजाब येथील काँग्रेस सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जिवीताशी खेळण्याचे प्रकार केला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने तेथील सरकार व काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, सरचिटणीस भिमराज सागडे, जिल्हा सचिव सालार शेख, शहराध्यक्ष रवी सुरवसे, नगरसेवक सागर फडके, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, नितीन दहिवाळकर, जगदीश धूत, अमोल घोलप, अशोक गाढे, महेश आर्य, मच्छिंद्र बर्वे, नितीन मालानी, संजय राऊत, अभिषेक गालफाडे, चैतन्य देहाडराय, अंकुश ढाकणे, प्रमोद तांबे, पंकज भागवत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT