<div class="paragraphs"><p>Sunil Kalekar, BJP leader</p></div>

Sunil Kalekar, BJP leader

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांने ओतले अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर पाणी...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा पालिकेच्या इमारतीसमोरच जलवाहिनीला गळती लागून यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात होते. याकडे पालिका प्रशासनाने दूर्लक्ष केल्याने आज संतप्त झालेल्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाने या प्रकाराचा निषेध करून बादली भर पाणी अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ओतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या अनोख्या आंदोलनाची सातारा शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सातारा पालिकेत सध्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. सध्या पालिकेची निवडणूक जवळ आल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर सातत्याने आरोप होऊ लागले आहेत. सातारा पालिकेच्या इमारतीसमोरच जलवाहिनीला गळती लागली असून यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात अनेकांनी ही बाबत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

पण त्याकडे प्रशासनाने दूर्लक्ष केले गेले. सातारा पालिकेच्या कारभाराविरोधात संतापलेल्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवक सुनील काळेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह पालिकेत पाण्याने भरलेली बादली घेऊन दाखल झाले. पण त्यावेळी कोणीच अधिकारी आपल्या दालनात उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पाणी ओतून निषेध नोंदवला. यावेळी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT