Narendra Modi, Shashikant Shinde
Narendra Modi, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : निवडणुकीसाठीच भाजपचा नोटाबंदीचा फंडा : शशिकांत शिंदे

Umesh Bambare-Patil

Shashikant Shinde News : आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटांवर बंदी आणली आहे. निवडणुकीसाठी केलेला हा फंडा असून ज्या ज्या वेळी नोटाबंदी झाली. त्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या, हा आजवरचा इतिहास असून आज झालेली नोटाबंदी हा नक्कीच योगायोग आहे का, असा खोचक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने RBI घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी नोटाबंदीच्या या निर्णयावर केंद्र सरकारवर आपल्या व्टीटर अकौंटवरुन टीकेची झोड उठवली आहे.

आली आली निवडणूक आली, नोटाबंदी जाहीर झाली..,जनतेच्या खिशात राहिलेले पैसे काढून घ्यायची वेळ झाली… अशी कविता सादर करुन शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, मागे नोटबंदी जाहीर केली होती. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला गेला होता. त्यावेळच्या दोन हजार रुपयांच्या नोटा कुठे गेल्या, याचा शोध लागत नाही.

निवडणुकीला मात्र दोन हजारांच्या नोटा बाहेर पडतात. बाजारामध्ये काढलेल्या नोटा कुठे गेल्या हा शोध घेण्यासाठी नोटाबंदी करणे हा एकच प्रपंच केंद्राकडे राहिला आहे. निवडणुकीसाठी केलेला हा फंडा असून ज्या ज्या वेळी नोटाबंदी केली गेली, त्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. हा आजवरचा इतिहास आहे. आता दोन हजारांच्या नोटांची झालेली बंदी हा नक्कीच योगायोग आहे का, हे पण पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT