Sadabhau Khot, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : भाजपचा सैतान सदाभाऊंमध्ये शिरलाय…शशिकांत शिंदे भडकले

Shashikant Shinde सातारा शासकिय विश्रामगृहात आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Umesh Bambare-Patil

Shashikant Shinde News : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीक केली होती. त्याला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. आमदार शिंदेंनी श्री. खोत यांच्यात भाजपरुपी सैतान घुसलाय, असे म्हटलंय.

सातारा शासकिय विश्रामगृहात आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्हीही खासदार शरद पवार Sharad Pawar यांचे कार्यकर्ते असून आम्ही ही बोलू शकतो. आम्ही कामगार चळवळीतील असून ते शेतकरी चळवळीतील आहेत. आमचे व त्यांचे चांगले ऋृणानुबंध आहेत.

पण, माजी मंत्री सदाभाऊ यांच्याकडे एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही बघत होतो. पण, भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपरुपी सैतान त्यांच्यात घुसलाय. ते थेट खासदार शरद पवार यांच्यावर टीक करायला लागले हे दूर्दैवी आहे. राज्यातील राजकारणाची पातळी संपली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, राजकारण आता खालच्या पातळीवर गेले असून हे भविष्यासाठी धोकादायक आहे. आरोप, प्रत्यारोप खालच्या पातळीवर येऊन करणे योग्य नाही. असेच चालू राहिले तर राजकारणाविषयी लोकांत तिटकारा निर्माण होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीतील दुफळीवर भाष्य करताना आमदार शिंदे म्हणाले, पक्षातील दुफळीचा परिणाम आगामी काळात पहायला मिळणार आहे. खासदार शरद यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील आम्ही दोघे, तिघेच राहिलो आहोत. आता पुन्हा एकदा पक्ष वाढविण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे फुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार असल्याचे शिंदे यांनी नमुद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT