Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय महाडिकांनी कदमांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीतच केला हलगीचा कडकडाट!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) उमेदवार माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम (Satyajeet Kadam) यांनी बुधवारी (ता. २३ मार्च) जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (kolhaur byelection) आपला अर्ज भरला. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीत माजी खासदार तथा या निवडणुकीचे रणनितीकार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी चक्क हलगी वाजवत ताल धरला. या रॅलीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्यातील भाजपसह मित्रपक्षांचे झाडून सर्व नेते सहभागी झाले होते. (BJP's Satyajit Kadam files nomination papers)

दसरा चौकात सकाळी ९ वाजता भाजप आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते जमू लागले. दहा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सुरु झाली. हलगीचा कडकडाट आणि तुतारीची ललकारी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. भाजपच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. भगव्या टोप्या आणि स्कार्फ गळ्यात घातले होते. महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. दसरा चौक, व्हीनस कॅर्नर, हॉटेल पॅव्हिलयन मार्गाने रॅली उद्योगभवन समोर आली. येथे नेत्यांनी मार्गदर्शन केले.

रॅलीमध्ये उघड्या टेंपोमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे, सत्यजीत कदम होते. सत्यजित कदम यांच्याबरोबर अर्ज भरताना प्रा. जयंत पाटील, प्रा. शहाजी कांबळे, चंद्रकांत पाटील, अमल महाडिक, समरजित घाटगे उपस्थित होते. रॅलीमध्ये माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सुनील कदम, राहुल चिकोडे, सुहास लटोरे, प्रा.जयंच पाटील, माणिक पाटील (चुयेकर) माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, विजय खाडे-पाटील, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, किरण नराते, मुरलीधर जाधव, भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई, विजय पाटील, हेमंत अराध्ये, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, सचिन तोडकर हे होते.

शिवसेनेची अवस्था बघवत नाही : चंद्रकांत पाटील

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या शिवसेनेची अवस्था बघवत नाही. कारण, त्यांना आता काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे. ज्या मतदार संघात ५ वेळा शिवसेनेचा आमदार झाला ती जागा काँग्रेसला गेली आहे. शिवसैनिकांनी हे लक्षात ठेवावे की बंटी पाटील हे माणूस संपवणारे आहेत.’’

भाजपचा विश्वास सार्थ ठरवेन : सत्यजित कदम

सत्यजीत कदम म्हणाले, ‘‘पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला डब्यात घालू असे म्हटले; पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या केवळ २ जागा निवडून आल्या. तेथील जनतेने काँग्रेसला बाटलीत बंद करून समुद्रात फेकून दिले. मी सामान्य कार्यकर्ता आहे. भाजपने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. मी अथक प्रयत्न करून हा विश्वास सार्थ ठरवेन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT