Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : लहान पक्षांचे ब्लॅकमेलिंग चालणार नाही, संभाजीराजे-राजू शेट्टी यांना सतेज पाटलांनी ठणकावले

Rahul Gadkar

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांनी त्या अनुषंगाने राजकीय खेळी सुरू केली आहे. तर महायुती मधील शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी देखील जागा वाटपाची चर्चा सुरू ठेवली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत राज्यातील प्रादेशिक छोट्या-मोठ्या पक्षांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याने तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडला आहे. स्वराज्य शासन संस्थापक अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यावर काँग्रेसच्या नेत्याने निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात केवळ महायुती आणि महाविकास आघाडी हेच प्रमुख राहतील. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला स्थिर सरकार हवं आहे. महाराष्ट्रातील लहान पक्षांची ब्लॅकमेलिंग या राज्यामध्ये चालणार नाही हे लोकांना माहीत आहे. लहान पक्षाच्या टेकूवर सरकार कोणाचे यावे अशी जनतेची अपेक्षा नाही. असा टोला त्यांनी तिसरी आघाडी करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.

'महायुतील नाराजीवर बोलताना सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला, आमदार बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू ठेवल्यानंतर सतेज पाटील यांनी महायुतीतील भांडण आता रस्त्यावर होऊ लागले आहेत. अनेकजण नाराज आहेत. ज्यात विविध ठिकाणी महायुतीमधील नाराजी समोर येत आहे. बीड मधील आमदारांनी तर लढण्यास नकार दर्शवला आहे'. असे सतेज पाटील (satej Patil) म्हणाले.

'लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संविधान बचाव याचा प्रयत्न करून वस्तूस्थिती लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. यांची धास्ती भाजपला आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता विधानसभेमध्ये देखील त्यांना भीती आहे. महाराष्ट्रात वाचाळवीर म्हणून ज्यांची ओळख आहे .त्यांची ही भाषा आहे. संजय गायकवाड यांनी वापरलेल्या भाषेचा निषेध करतो. आम्हाला देखील अशी भाषा वापरता येते. मात्र काँग्रेसची(Congress) ती संस्कृती नाही. जनता हे सर्व बघत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना उत्तर देईल', असेही पाटील म्हणाले.

'महायुतीमधील भांडण मिटणार नाहीत. महाविकास आघाडीचे जागा वाटपाची चर्चा व्यवस्थित सुरू आहेत. लोकसभेला देखील आम्ही समन्वय ठेवून जागावाटप केले होते. महायुती मधीलच नेते म्हणत आहेत की लोकसभेप्रमाणे आता करू नका. जागावाटप हे महायुतीचे थांबले आहे. तिसरा पक्ष महायुतीत आल्यामुळे त्यांच्यात जास्त भांडणं सुरू आहेत. महायुतीतील भांडण रस्त्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील एक जिल्हा दाखवा की ज्या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या नेत्यात वाद नाही.' असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT