मुंबई उच्च न्यायालयाने CSMT, मरिन ड्राईव्ह आणि फ्लोरा फाऊंटन परिसर आंदोलकांपासून रिकामा करण्याचे आदेश दिले.
गणेश विसर्जनादरम्यान गोंधळ टाळण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला कारवाईचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
Pune News : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आज चौथ्या दिवशीही सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारलाही फटकारले. यावेळी न्यायालयाने मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत. उद्या 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते, त्यामुळे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निर्देश हे दिले आहेत. दरम्यान आता राज्य सरकारही अलर्टवर आले असून आंदोलकांना हटवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे -पाटलांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
यावेळी फडणवीस यांनी, जरांगे यांच्या आंदोलनावर कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता अशल्याचे सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी, मी प्रवासात असल्याने नेमकं उच्च न्यायालयाने कोणते निर्देश दिलेत याची माहिती नाही किंवा न्यायालयाने काय म्हटलंय ते मी ऐकलं नाही. पण न्यायालयाने या आंदोलना वेळी काही अटी व शर्तींचे उलंघन झाल्याचे म्हटलं आहे. तसेच सध्या जे आझाद मैदान असो किंवा त्या परिसरातील रस्त्यांवर जे काही प्रकार सुरू आहे. त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतरच न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्यामुळे जे निर्देश दिले गेलेत त्याचे पालन करण्याचे काम निश्चितच प्रशासनाकडून केले जाईल. प्रशासन ते निश्चित करेल. तसेच आजच्या बैठकीत या आंदोलनावर चर्चा झाली. तर जरांगे यांची मागणीनुसार आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्गांवर चर्चा झाली. आमची मानसिकताही फक्त कायदेशिर मार्गावर ठिकणारे आरक्षण देण्याची आहे.
या आंदोलनात काही महिला पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती मिळत असल्यावरून फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, महिला पत्रकारांचा विनयभंग करणारी घटना ही कुठेतरी या आंदोलनास गालबोट लावणारी आहे. कारण याआधीही राज्यात 30 हून अधिक मराठे मोर्चे हे शिस्तबद्ध पद्धतीने निघाले होते. ज्यानंतरच सरकराने मोठे निर्णय घेतले. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओवरून देखील फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधकांना फटकारले आहे. त्यांनी राजकीय पोळी भाजणं बंद करा, असा सल्ला दिला आहे. तर जे अस करत असतील त्यांनी न थांबल्यास त्यांचेच तोंड पोळेलं असाही इशारा दिला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणविषयक विशेष उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील न्यायालयाचे निर्देश येताच मराठा आंदोलकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यांनी, जे मराठा आंदोलक आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक समजले जातील, अन्यत्र फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल" अशा स्पष्ट शब्दांत राज्य शासनाच्यावतीची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी आंदोलकांच्या हुल्लडबाजीवर देखील भाष्य केलं असून मी जरांगेंना पहिल्या दिवसापासून हिच विनंती करत आलो आहे की, याआधी देखील 58 मोर्चे निघाले असून मुंबईतही 6 ते 7 लाखांचा मोर्चा आला.
पण त्याला कुठेही गालबोट लागलेलं नाही. मात्र यावेळी या उपोषणाच्यानिमित्त जे पाठिंबा देण्यासाठी लोक आले आहेत ते आझाद मैदानात न बसता अन्य ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर अनेकांना त्रास झाला. काही महिला पत्रकारांवर प्रसंग आलेत, तसंच मुंबईच्या सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यावरच निरिक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. जर हे समाजकंटक म्हणून आले असतील आणि आंदोलन बदनाम होत असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे, त्यात तर वादच नाही.
प्र.१. न्यायालयाने काय आदेश दिला?
उ. दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
प्र.२. आदेश का दिला गेला?
उ. गणेश विसर्जनादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदेश दिला गेला.
प्र.३. सरकारची भूमिका काय आहे?
उ. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री विखे पाटील यांनी आंदोलक हटवण्यासाठी कारवाईचे संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.