Ramraje Naik Nimbalkar-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरेंचे रामराजेंबाबत मोठे विधान; ‘ आम्ही संघर्ष संपवलेला आहे...’

Ramraje Naik Nimbalkar News : रामराजे नाईक निंबाळकर हे कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. त्यांना स्वतःला माहिती आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षात आहेत, हे तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या.

Vijaykumar Dudhale

Satara, 24 December : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माण खटावचे जयकुमार गोरे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे वैर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ झालेले जयकुमार गोरे यांनी आज आश्चर्यकारक विधान केले आहे. ‘आम्ही संघर्ष संपवलेला आहे, संषर्घात ताण आणि शक्ती उरलेली नाही,’ असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यांची विधानाची एकच चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे

राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राज्याचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना जयकुमार गोरे यांनी आपले पारंपारिक राजकीय विरोधक माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत भाष्य केले आहे.

तुम्ही फिरून तिथंच (रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar) का येता?. आम्ही संघर्ष संपवलेला आहे. संषर्घात ताण आणि शक्ती उरलेली नाही, तुम्ही काळजी करू नका. अस्ते अस्ते सगळ्या गोष्टी होत राहतील, असे राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान केलेले आहे. गोरे आणि रामराजे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे या विधानाची विशेष चर्चा होताना दिसत आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, रामराजे नाईक निंबाळकर हे कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. त्यांना स्वतःला माहिती आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षात आहेत, हे तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या. पण, रामराजे म्हणजे फलटण नाही, तर फलटणमध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहोत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले काय म्हणाले?

आम्ही आज महायुतीमध्ये आहोत. पण ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आम्हाला ज्या सूचना देतील, त्यानुसार आम्ही निवडणुकीसंदर्भात वाटचाल करू. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे, अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचं मत आहे. आम्ही तो नक्की करणार, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT