Chetan Gaekwad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरातील राष्ट्रवादी नगरसेवकपुत्राला स्टंटबाजी पडली महागात; हातात पिस्तुल घेऊन बुलेटवर स्टंट; गुन्हा दाखल

चेतन गायकवाड हे हात सोडून बुलेट चालवत आहेत आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन स्टंटबाजी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : हातात पिस्तुल घेऊन हात सोडून बुलेट चालविण्याचा स्टंट करणे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नगरसेवक पुत्राच्या चांगलाच अंगलट आला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी नगरसेवक पुत्रासह दोघांवर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Case has been registered against the son of NCP corporator in Solapur who performed stunts)

रामवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांवर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील कर्मचारी सचिन शिंदे यांनी दिली.

सोलापुरात रविवारी (ता. १२ मार्च) रंगपंचमी जोरात साजरी झाली. यानिमित्ताने नागरिकांनी रंग खेळतानाचे विविध रिल्स तयार केले आहेत. अनेक हौशी नागरिकांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच पद्धतीने नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांनी रंगपंचमी दिवशी काही रिल्स तयार केले होते. त्या रिल्समुळे गायकवाड अडचणीत सापडले आहेत.

चेतन गायकवाड हे हात सोडून बुलेट चालवत आहेत आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन स्टंटबाजी केली आहे. त्याबाबतचा काही रिल्स तयार करून गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. हौशेने अपलोड केलेला हा रिल्स गायकवाड आणि भंडारी या दोघांच्या अंगलट आलेला आहे.

हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस कर्मचारी सचिन शिंदे यांनी नगरसेवकपुत्राविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर रिल्स तयार करणारे चेतन गायकवाड आणि राजू भंडारी यांच्यावर भा. दं. वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये स्टंटबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. ती खरी असेल तर पोलिस पिस्तूल जप्तीची कारवाई करू शकतात. तसेच, त्यांच्याडे शस्त्र परवाना आहे का नाही, याची पोलिस तपासात चौकशी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT