Dhayshil Mohite Patil
Dhayshil Mohite Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपचे नेते धैयशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल ; रिव्हालव्हरने धमकावल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : भाजपचे नेते धैयशील मोहिते पाटील (Dhayshil Mohite Patil)यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकलूज पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.धैयशील मोहिते पाटील यांच्यासह तीन जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंतसंस्थाच्या कर्जाची वसुली करताना डोक्याला रिव्हालव्हर लावून मारहाण केल्याची तक्रार त्यांच्यावर दाखल करण्यात आली होती. त्यावरुन अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या धैयशील मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने सांगोल्याच्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद होते. देशमुखांनी हे पद चांगले सांभाळले. आक्रमक वक्तृत्वशैली असलेल्या श्रीकांत देशमुखांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्यांना आपलं पद इतक्या वाईट परिस्थितीत सोडावे लागेल हे कुणाला माहित नव्हते. एका महिलेसोबतचा थेट बेडरूम मधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशमुखांची मोठी बदनामी झाली. पक्षाचीही बदनामी होत असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा दिला.

सध्या भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले तात्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, माळशिरसचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे शिवाजी कांबळे आणि मोहोळचे विजयराज डोंगरे यांच्या नावाची चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची यापूर्वी चर्चा झाली होती मात्र त्यांची जिल्हाध्यक्ष पदाची संधी हुकली आता त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची जिल्ह्यावरील पकड पुन्हा वाढवण्याची संधी निर्माण होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT