Nitesh Rane News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणे अन् टी राजा सिंग यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल; धार्मिक तेढ...

Solapur Political News : धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य...

Chetan Zadpe

Solapur News : हिंदू जन आक्रोश मोर्चावेळी दगडफेकीचा प्रकार आढळून आला होता. आता यामध्ये धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याच्या ठपका ठेवत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रमाणे 12 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आले आहे. यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हा मोर्चा निघण्यापूर्वीच आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंग या दोघांनाही पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. तेढ आणि विद्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य आणि कृती टाळण्याची सूचना पोलिसांनी केले होते. मात्र या मोर्चादरम्यान या दोन्ही आमदारांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सोलापूरच्या जेल रोड पोलिस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणे आणि टी राजा सिंग यांच्या नेतृत्त्वात काल सोलापूर शहरात वक्फ बोर्ड कायदा (Waqf Board Act) रद्द व्हावा, या मागणीसाठी मोर्चा निघाला. हा मोर्चा जेव्हा 'मधला मारुती'या भागात पोहचल्यानंतर काही अज्ञातींनी दुकानांची तोडफोड केली. यात दगडफेक घडल्यामुळे यात काही जण जखमी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटनेच्या ठिकाणावरुन पोलिसांनी सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर यांना अटक करुन त्यांच्यावर आणि 12 ते 15 अज्ञातांवर गुन्हे नोंदवण्यात आले. कलम 153(अ), 295, 295(अ), 143, 147, 149, 336, 337, 427, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT