पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics: राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल; काय आहे कारण?

सरकारनामा ब्युरो

Solapur News: सोलापूरमधील माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील (Vinayakrao Patil) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या भिसे महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या भरतीत बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपाप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे महाविद्यालयाचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली आहे. (Maharashtra Political news)

के. एन. भिसे कला, वाणिज्य आणि विनायकराव पाटील सायन्स कॉलेजच्या प्राचार्य भरतीत पाटील यांनी फेरफार केली. प्राचार्य भरती वेळी शिक्षण संचालकांकडे ऑनलाइन अर्ज भरताना त्यांनी बनावट आणि बोगस कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादी सुसलादे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. माढा न्यायालयाने पाटील यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संस्थेचे प्राचार्य आर. आर. पाटील हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर काही आवश्यक बाबी पूर्ण करताना प्राचार्य पद भरतीबाबत शिक्षण संचालकांना अर्ज करण्यात आला होता. ऑनलाइन अर्ज करताना त्यांनी स्वतःच्या लेटरहेडवर सर्व बाबी खऱ्या असल्याचे भासवले. पण, ही बाब सुसलादे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी थेट न्यायालयात धाव घेलती होती. न्यायालयाने पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशदिल्यानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT