Jayant Patil |
Jayant Patil | 
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News | एसटी बस चालवणे पडले महागात; जयंत पाटलांविरोधात तक्रार दाखल

सरकारनामा ब्युरो

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना एसटी बस चालवणे पडणार महागात पडणार आहे. बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत भाजपचे (BJP) वाळवा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त जयंत पाटील यांनी थेट एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जयंत पाटलांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट एसटीचे स्टेरिंग हातात घेत फेरफटकाही मारला. पण आता त्यांचे हेच पाऊल त्यांच्या अडचणी वाढवणार असल्याचे दिसत आहे.

बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत भाजप नेत्यांनी इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या चालवल्याचा आरोप भाजप धैरशील मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिनी जयंत पाटलांनी एसटीचीही माहिती घेत थेट एसटी बस चालवली. इस्लामपूर शहरातील रस्त्यावरून त्यांनी एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. एसटी चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला. यावेळी त्यांनी चालकाकडून एसटी कशी चालवायची, एसटीतील तांत्रिक बाबीही जाणून घेतल्या होत्या. मात्र आता त्यांना हेच एसटी बस चालवणं महागात पडणार असल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT