BJP corporator Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP corporator : भाजप नगरसेवकाचा चक्री गेम मटका चालू...पोलिस आयुक्त लक्ष द्या : तरुणाची सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Solapur Political Crime : भाजपच्या नगरसेवकाविरोधात फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तात्या लांडगे

Solapur, 03 July : सोलापुरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात सोलापूर शहरातील जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पोस्टमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आणि पक्षाची बदनामी केल्याची फिर्याद भाजप नगरसेवक अनंत जाधव (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या फिर्यादीवरून फेसबुकवर पोस्ट करणारा राज पांढरे (रा. निराळे वस्ती, सोलापूर शहर) या तरुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मराठा वस्तीमधील संपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. २ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास बसलो असताना ओळखीच्या राज पांढरे याने त्याच्या फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे दिसून आले. त्यात भाजप नगरसेवक अनंत जाधव हा चक्री गेम चालवतो, पोलिस आयुक्तांनी लक्ष द्यावे, असे नमूद होते.

सुहास कदम याला सपोर्ट असेही त्या पोस्टमध्ये लिहिलेले होते. या अवैध व्यवसायासाठी माझा व पक्षाचा काहीही संबंध नसल्याची माहिती असताना देखील त्याने जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने ती खोटी पोस्ट टाकल्याचेही नगरसेवक अनंत जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या फेसबुक पोस्टप्रकरणी राज पांढरे याच्याविरुद्ध ‘बीएनएस’ कायद्यातील कलम ३५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस राज पांढरे याच्या घरी गेले होते, पण तो सापडला नाही. चौकशी करून त्याला नोटीस बजावण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज मुलाणी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT