gopichand padalkar
gopichand padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर यांना आता केंद्राची एक्स सुरक्षा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आणखी एका नेत्याला केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना आता केंद्राची एक्स (X) सुरक्षा असणार आहे. त्यामुळे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यानंतर आता पडळकर हेही केंद्रीय सुरक्षेच्या कवचाखाली असणार आहेत. (Centre's security for MLA Gopichand Padalkar now)

आमदार गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात अनेकदा भूमिका घेतलेले आहे. सध्याही ते पवारांवर कडवट शब्दांत टीका करत असतात. काही महिन्यांपूर्वी पडळकर यांच्यावर सोलापुरात हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या गाडीवर दगड टाकण्यात आला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथेही हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पडळकर यांना ही सुरक्षा दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्यातील भाजपने राज्य सरकारकडे पडळकर यांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र, राज्य सरकारकडून त्यांना अद्याप सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजप नेत्यांच्या विनंतीवरून आता केंद्र सरकारनेच पडळकर यांना सुरक्षा दिली आहे. त्यामुळे पडळकर यांना आता केंद्राची सुरक्षा असणार आहे. ते केंद्र सरकारच्या CISF ची X सुरक्षा असणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा तसेच सिने अभिनेत्री कंगना राणावत यांना केंद्र सरकारची सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. यातील बहुतांश नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. अभिनेत्री राणावत यांनी थेट शिवसेनेच्या विरोधात जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरीत टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT