Kolhapur News: कोल्हापूर उत्तर पाठोपाठ चंदगड विधानसभा मतदारसंघात ही उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे.
संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकारी नेते आणि काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्याबाबतचे भूमिका घेत नुकताच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांचा मेळावा रविवारी चंदगडमध्ये पार पडला. या मेळाव्यात आमच्यापैकी कोणालाही संधी द्या, अशी मागणी करण्यात आली.
केवळ निवडणुकीपुरती मतदारसंघात येणाऱ्या लोकांना जनता स्वीकारणार नाही. महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी जनतेच्या संपर्कात असणाऱ्या नेत्यालाच उमेदवारी द्यावी. शिवाय पक्ष संकटात असताना मदतीला धावून जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी असा सूर या मेळाव्यात उमटला. मात्र उपऱ्या लोकांना उमेदवारी मिळाली, तर महाविकासला ही जागा गमावण्याची वेळ येईल.
म्हणून वरिष्ठांनी मतदारांचा कल पाहावा आणि आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, असा सूर मेळाव्यात उमटला. महाविकास आघाडीतर्फे आज महागावच्या अनिकेत मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा झाला.
दिवंगत नेते बाबा कुपेकर यांच्या राजकीय वाटचालीत मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. त्यांनीही मला पदे दिली मात्र माझी होणारी प्रगती आता त्यांच्याच लोकांच्या डोळ्यात खूपत आहे. त्यांच्याकडून मला त्रास देणे सुरू आहे. व्यासपीठावर हजर असलेल्यांना वगळून इतरांना उमेदवारी मिळाल्यास मी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष लढणार असल्याचा इशारा अप्पी पाटील यांनी दिला.
काँग्रेसचे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, अंजनाताई रेडेकर, विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर चव्हाण, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रियाज शमनजी, प्रभाकर खांडेकर, समन्वयक संपत देसाई आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.