Chandrahar Patil .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrahar Patil News: एकनाथ शिंदेंसमोर नाव मिळवलं, मार्केट खाल्लं 'डबल महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटलांनी; पण गुन्हा दाखल झाला...

Bull Cart Race Competition: श्रीनाथ बैलगाडी शर्यत स्पर्धा राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्याचे कारण ही तसेच होते. स्पर्धेतील विजेत्यांना आलिशान फॉर्च्युनर, महिंद्रा थार, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांची खैरात केली होती. राज्यभरातून लाखो शर्यत शौकिनांनी ही स्पर्धा बघण्यासाठी बोरगावच्या माळावर गर्दी केली होती.

Rahul Gadkar

Sangli News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे यल्लमादेवी यात्रेनिमित्त श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा पार पडली. यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी राज्यभरातील शर्यत शौकिनांना आवाहन करत मोठी जाहिरात बाजी केली होती. स्पर्धेतील विजेत्यांना आलिशान गाड्या बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आल्याने त्याला राज्यभरातून शर्यत शौकिनांनी गर्दी केली होती. स्पर्धेच्या आयोजनापासून ते स्पर्धेच्या शेवटपर्यंत चंद्रहार पाटील आघाडीवर होते.

खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्पर्धेला आल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेचे मार्केट खात राज्यात नावही मिळवलं. पण अटी आणि शर्तींचा भंग झाल्यानंतर स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा नोंद झाला आहे. आयोजक नामदेव पाटील यांच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्रीनाथ बैलगाडी शर्यत स्पर्धा राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्याचे कारण ही तसेच होते. स्पर्धेतील विजेत्यांना आलिशान फॉर्च्युनर, महिंद्रा थार, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांची खैरात केली होती. राज्यभरातून लाखो शर्यत शौकिनांनी ही स्पर्धा बघण्यासाठी बोरगावच्या माळावर गर्दी केली होती. या स्पर्धेची जाहिरात अनेक जिल्ह्यात मोठ्या होर्डिंगवर झळकली होती. त्यावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा फोटो झळकला होता.

स्पर्धेदरम्यान, बैलगाडी शर्यतीत अपघात होऊन एका शर्यत शौकिनाचा मृत्यू झाला होता. अंबाजी शेखु चव्हाण (वय.60 कारंडेवाडी, सांगोला) चे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव होते. या घटनेनंतर प्रशासनाकडून नायब तहसीलदार संजय गजानन पवार यांच्याकडून स्पर्धेच्या अटी आणि शर्तीचे भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, आयोजक नामदेव पोपट पाटील (रा. बोरगाव) यांनी बोरगावच्या कोंड्याचा माळ परिसरात स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेदरम्यान दिलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आले.

स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या बाजूला बॅरिगेट्स आणि सुरक्षितेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका आणि निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झाला. बाब निदर्शनास आल्यानंतर आयोजकांवर गुन्हा नोंद केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT