Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : प्रकाश आबिटकर, मी... आम्ही कामगारांची मुलं आमदार अन् मंत्री झालो, हेच काँग्रेसचं दुखणं!

Chandrakant Patil on Congress : चंद्रकांतदादा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका येथील खानापूर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनसाठी आले होते.

Rahul Gadkar

Kolhapur News : प्रकाश आबिटकरांचे वडील बिद्री कारखान्याचे कामगार आणि माझे वडील गिरणी कामगार होते. आज मी मंत्री आहे तर प्रकाश आमदार आहे. कामगारांची मुले मंत्री-आमदार कसे होतात? हे काँग्रेसचे दुखणे आहे असा टोला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला. ते कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका येथील खानापूर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन मेळाव्यात ते बोलत होते.

दोन महिन्यांनी भावी आमदार प्रकाश आबिटकरांची निवडणूक आहे. मी आलो नाही म्हणून चुकीचा मेसेज मतदारसंघात फिरू नये. शिवाय पत्रकारांना देखील हेडिंग मिळू नये म्हणून आलो. अशी कोपरखळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावली. काही कारणांनी मंत्री पद मिळाले नाही पण राजकारणात वेळ यावी लागते तेही वेळ यावेळी येईल, अशी भावना आमदार प्रकाश आबिटकर यांच्याबाबत व्यक्त करत. उद्याचे आमदार प्रकाश आबिटकर असा चंद्रकांत पाटील यांनी उल्लेख केला.

आम्ही देखील दूध विकून चांगल्या शाळेत गेलो. शाळा चांगली असेल तर मुलांचे शिक्षण चांगले होते. असे सांगत पुढे निवडणूक आहे. शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोणी दिले असे अनेकजण म्हणतील. आबिटकर (Prakash Abitkar) उमेदवार असावेत की नसावेत याबाबत कोणाला शंका असेल का? प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी मिळणार नाही असे कोणाला वाटते का? त्यांच्या कार्याने मला देखील वाटते त्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे हा माझा आशावाद असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT