Chhagan Bhujbal News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ते एक दिवसही टिकणार नाही, असे का? म्हणाले छगन भुजबळ

Bhujbal went to Naigaon and greeted Krantijyoti Savitribai Phule: नायगाव येथे जाऊन भुजबळांनी केले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Vishal Patil

Satara News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे- पाटील यांच्याकडून बेमुदत उपोषणाची हाक दिली असून आता ओबीसी समाज 20 जानेवारीपासून आंदोलन सुरू करणार आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे ओबीसीनेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ते एक दिवसही टिकणार नाही, असे मंत्री भुजबळांनी म्हटले आहे.

नायगाव येथे बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ आले होते. यावेळी मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ते टिकेल का? यावर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चार-पाच आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे. त्यामुळे सरसकट आरक्षण मराठा समाजाला दिलं, तर ते एक दिवसही टिकणार नाही. परत त्याच रस्त्याने जायचं असेल तर त्यावर मी काय बोलू. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असून तो यशस्वी केला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठ्यांनी ओबीसीत येऊ नये

ओबीसी समाजाचे 20 जानेवारीपासून आंदोलन सुरू होतंय. आमचं म्हणणं आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढेच आहे. एवढेसुद्धा आम्ही बोलायचं नाही, म्हणजे खूप झालं. मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं द्या. त्यासाठी आयोग कामाला लागला आहे. त्याचं सर्वेक्षण सुरू आहे. त्याप्रमाणे द्या, दोन वेळा कायदा पुढे आला, त्याला पाठिंबा मी दिला. सध्या ओबीसीत पावणेचारशे जाती आहेत. त्यामध्ये तुमचाही फायदा नाही आणि आमचाही नाही. त्यामुळे मराठ्यांनी ओबीसीत येऊ नये. वेगळे आरक्षण द्या, सुप्रीम कोर्टात ते अडकलं ते मिळावं त्याला पाठिंबा आहे.

मी काय करू, मी काय बोलू?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये भाजपच्या उपस्थित नेत्यांनी बाबरी मशीद पाडू नये, यासाठी प्रयत्न केले होते असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, 'मी तिथे गेलो नव्हतो‌. मी काय करू?' तेथील शिवसैनिक गेले असतील. त्याबद्दल मी काय बोलू शकतो.

Edited by : Chaitanya Machale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT