श्रीपाद छिंदम
श्रीपाद छिंदम सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

छिंदम पुन्हा तोंडघशी : निवडणूक स्थगितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेचा नगरसेवक शिवद्रोही श्रीपाद छिंदम ( Shripad Chhindam ) याचे नगरसेवकपद नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी रद्द ठरविण्याचा निर्णय दिला होता. त्याने महापालिकेच्या प्रभाग 9 क मधून निवडणूक लढविली होती. त्याच्या रिक्‍त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीला स्थगितीसाठी छिंदमने केलेला अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी फेटाळला. Chhindam again: Court rejects application for postponement of elections

श्रीपाद छिंदम भाजपमध्ये असताना त्याला उपमहापौर मिळाले होते. या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्‍तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उपटल्या होत्या. शिवसेने महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. या सभेत उपमहापौरपद व नगरसेवक पदा वरून बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीपाद छिंदमने प्रभाग क्रमांक नऊ-क मधून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीतील मतदानाच्या दिवशीच छिंदमच्या भावाने मतदान यंत्राची पूजा केली होती. त्यावरून श्रीपाद छिंदम पुन्हा टीकेचा विषय ठरला होता.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 13 (1) नुसार 27 फेब्रुवारी 2020 रोजी छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले. कोरोना संसर्गाची लाट असल्याने या रिक्‍त जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने छिंदमच्या जागेवर पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

छिंदमने अहमदनगर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करून नगरसेवकपद रद्दचा निर्णय स्थगित करावा, तसेच निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारतर्फे ॲड. अनिल ढगे तर महापालिकेतर्फे ॲड. महेश काळे यांनी बाजू मांडली. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर न्यायालयास हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून छिंदमच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT