Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Chairman : सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत गोरेंनी पुन्हा ठणकावलं; म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नीट अन्‌ क्लिअर ठरलंय...

Jaykumar Gore Statement : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक नेते नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Satara, 15 Novemer : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. महायुतीने सर्व जागा जिंकल्याने कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार, याची उत्सुकता आहे. त्यातच शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, असे म्हटले आहे. ते खोडून काढण्याचे काम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा केले आहे. सातारा जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील, असे पुन्हा ठासून सांगितले. हे सांगताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काय घडलं होतं, हेही पुढे आणले आहे.

मंत्री गोरे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो. महायुती म्हणून लढताना अनेकांनी अनेकांची परीक्षा बघितली. जिह्यात कोणाची किती राजकीय ताकद आहे, हे पाहिलं. तसेच, सगळ्यांनी आपापली राजकीय ताकदही अजमावून पाहिली आहे.

महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतर आम्ही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आलो, जागा वाटप आणि निवडणूकही झाली, असे गोरेंनी नमूद केले.

ते म्हणाले, निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांसोबत आमची जेव्हा बैठक झाली. बैठकीत जेव्हा चेअरमन निवडीचा विषय आला, तेव्हा चेअरमन निवड ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवतील, असा आमचा एकमताने निर्णय झाला. पुढची प्रक्रिया त्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवरही आमची बैठक होईल. त्यानंतर जो काही निर्णय पुढे येईल, तो आम्ही मुख्यमंत्री किंवा महायुतीच्या नेत्यांपर्यंत पोचवू.

शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर गोरे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंकडे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे नेतृत्व होतं. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे समोरच्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यासंदर्भाने या दोघांमध्ये काय चर्चा झाली का?, याची मला माहिती नाही. पण, ती भेट ही विकास कामांच्या निधीसंदर्भात होती, जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने नसावी, असं माझं मत आहे.

शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवरच जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय झाला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर गोरे म्हणाले, महायुती म्हणून स्थानिक पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे होती, त्याचवेळी हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला पाहिजे, असे म्हणणं संयुक्तीक आहे. जिल्हा बॅंकेच्या संदर्भातील सर्व चर्चा ही स्थानिक पातळीवर नव्हे; तर राज्य पातळीवर झाली आहे. त्यानंतरच जागावाटप ठरलं.

त्या बैठकीत नीट आणि क्लिअर ठरलं आहे की, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा चेअरमन कोण असेल, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. त्यानुसार महायुतीचं खालचं नेटवर्क काम करेल. या व्यतिरिक्त कोणी स्वःतचं स्वतंत्र मत मांडलं असेल, तर त्या मताशी मी सहमत नाही, असंही गोरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT