Praful Patel while filing nomination papers for Rajya Sabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यसभेसाठी दिग्गजांचे अर्ज दाखल... कोणाचा पत्ता कट होणार?

राज्यसभेच्या खासदारपदाच्या सहा जागा महाराष्ट्रातून रिक्त झाल्या आहेत. यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

राज्यसभेसाठी आज भाजपकडून तीन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक तर काँग्रेसकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

Dr. Anil Bonde

राज्यसभेच्या खासदार पदासाठी भाजपकडून राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

Piyush Goyal

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

Dhananjay Mahadik

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Imran Pratapgadi

काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातील कवी व वक्ते इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नीलम गोऱ्हे.

Praful Patel

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT