gokul dudh sangh.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : गोकुळच्या सभास्थळी गोंधळ, बॅरिकेट्स तोडले; पोलिस अन् सभासदांमध्ये...

Gokul Dudh Sangh Latest News : गोकुळच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं जाऊ शकते. पण, सभेपूर्वी सभासद आणि पोलिसांमध्ये राडा झाला आहे.

Akshay Sabale

राहुल गडकर | कोल्हापूर :

गोकुळ दूध संघाची आज 62 वी सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडत आहे. ही सभा पुन्हा गाजू शकते. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, सभेपूर्वीच विरोधकांनी राडा घातला आहे. बॅरिकेट्स तोडून सभासद गोकुळच्या सभेत घुसले आहेत. यावेळी पोलिस आणि सभासदांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

गोकुळ दूध संघ आणि सर्वसाधारण सभेतील राडा हे एक समीकरण बनलेले आहे. यंदाही त्याला अपवाद ठरला नाही. यंदा गोकुळची 62 व्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सभासद सोडण्यावरून गोंधळ घातला. संतप्त झालेल्या सभासदांनी बॅरिकेट्स तोडून सभेस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि सभासदांमध्ये धक्काबुक्की झाली.

विरोधी पक्षाच्या संचालिका शौमिका महाडिक ( Shoumika Mahadik ) यांनीही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. विरोधी पक्षाच्या संचालिकांना प्रश्न मांडण्याची परवानगी नाही. सभासदांनी प्रश्न मांडावेत, असं गोकुळच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शौमिका महाडिक म्हणाल्या, "मी पण एक सभासद आहे. सभासद म्हणून तो माझा हक्क काढून घेऊ शकत नाहीत. बैठकीत मी माझे प्रश्न विचारू शकते."

1500 बोगस पास वाटले

"बोर्डाच्या बैठकीला 100 टक्के कोणीही उपस्थित नसते. संचालिक आणि माझ्या पक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे. कधी कधी मी बैठकीला हजर नसते. त्यामुळे सगळेच संचालक बैठकीला उपस्थित असतात, असं नाही. या सभेला विरोधकांना सभाव्यासपीठासमोर पोहचता येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी 1500 बोगस पास वाटले," असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.

झेंडे भिरकवले...

सभास्थळी व्यासपीठासमोर काँग्रेस नेते, सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. तसेच हातात नामंजूरचे फलक घेऊन विरोधकांनी सुरूवातीला सत्ताधाऱ्यांच्या काही ठरावांना विरोध केला. तसेच, दोन्ही गटाकडून आपआपल्या नेत्यांचे झेंडे भिरकवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT